NZ vs AFG, T20 World Cup 2022: संततधार पावसामुळं बुधवारी येथे होणार्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार होता. मात्र, पाऊस न थांबल्यामुळं हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात नाणेफेकही झालं नाही. आज इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेला सामन्यातही पावसानं व्यत्यय आणलं. हा सामना आयर्लंडच्या संघानं डेकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत पाच धावांनी जिंकला.
ट्वीट-
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवर मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार सामना पावसामुळं रद्द घोषित केल्यानंतर सुपर फेरीतील अ गटाच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळाला. ज्यात न्यूझीलंडचा संघ तीन गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दुसरीकडं, अफगाणिस्तानच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण मिळाला आहे. गुणतालिकेत अफगाणिस्तानचा संघ तळाशी आहे.
ट्वीट-
न्यूझीलंडचा संघ-
डेवॉन कॉन्वे (विकेटकिपर), केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, डॅरिल मिशेल, मार्टिन गप्टिल, अॅडम मिल्ने, मायकेल ब्रेसवेल.
अफगाणिस्तानचा संघ-
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला जजाई, इब्राहिम जद्रान, उस्मान घनी, नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी, कैस अहमद, नवीन-उल-हक, दरविश रसूली, मोहम्मद सलीम साफी.
हे देखील वाचा-