Devon Conway Tests Covid Positive : सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला असून तिसऱ्या सामन्यापूर्वी आणखी एक झटका लागला आहे. संघाचा महत्त्वाचा फलंदाज डेवोन कॉन्वेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ लंडन येथे दाखल झाल्यानंतर खेळाडूंची पीसीआर टेस्ट (PCR Test) करण्यात आली. यावेळी कॉन्वे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कॉन्वेसह अष्टपैलू मायकल ब्रेसवेल आणि सपोर्ट स्टाफमधील दोघेजणही कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या सर्वांना विलगीकरणात सध्या ठेवण्यात आले आहे. 


न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, 'न्यूझीलंडचा संघ लंडन येथे पोहोचल्यानंतर सर्वांची पीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी कॉन्वेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्यासह अष्टपैलू मायकल ब्रेसवेल आणि सपोर्ट स्टाफमधील फिजीओ विजय वल्लभ आणि ख्रिज डोनाल्डसन हे देखील कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी या सर्वांची कोरोनाचाचणी केली जाणार आहे.'



न्यूझीलंड मालिकेत 2-0 ने मागे


सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून यावेळी तीन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही मालिका सध्या इंग्लंडच्या पारड्यात झुकली आहे. पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. दुसरा सामना तर अत्यंत अटीतटीचा झाला दोन्ही संघानी दमदार खेळीचं प्रदर्शन घडवलं. पण अखेर सामना इंग्लंडनेच 5 विकेट्सने जिंकला. या मालिकेत जो रुट तुफान फॉर्ममध्ये दिसून येत आहे. दरम्यान आता तिसरा सामना 23 जूनपासून हेंडिग्ले, लीड्स याठिकाणी खेळवला जाणार आहे.


हे देखील वाचा-