KL Rahul Injury: भारतीय कसोटी संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारत एक कसोटी, तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली. दुखापतीमुळं भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल इंग्लंड दौऱ्यातून मुकण्याची शक्यता दर्शवली जातेय. तसेच जर्मनीत दुखापतीवर उपचार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेसाठी राहुलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दुखापतीमुळं तो मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर भारतीय फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतकडं संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. 


पीटीआयच्या वृत्तानुसार, सलामीवीर केएल राहुल अजूनही दुखापतीतून सावरला नाही. यामुळं तो इंग्लंड दौऱ्याला मुकणार आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर राहुल इंग्लंडला रवाना होईल, असं यापूर्वी बोललं जात होतं.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केएल राहुलची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. पण मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुलला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला या मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. केएल राहुलच्या जागी ऋषभ पंतकडं संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलचं दमदार कमबॅक
केएल राहुल सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतूनच त्याला या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यात यश आलं. केएल राहुल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्मासह टीम इंडियाचा पहिला पसंतीचा सलामीवीर आहे. इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माला नव्या सलामीवीरासोबत मैदानात उतरावं लागणार आहे. केएल राहुलच्या जागी कदाचित शुभमन गिलला सलामीला पाठवलं जाऊ शकतं. 


हे देखील वाचा-