Nitish Kumar Reddy Century : नितीश रेड्डीने मेलबर्नच्या मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. बॉक्सिंग डे कसोटीत नितीश टीम इंडियासाठी तारणहार ठरला. यासह नितीशने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतकही पूर्ण केले. शतक झळकावून नितीशने कांगारूंच्या भूमीवर इतिहास रचला आहे. 21 वर्षीय या फलंदाजाने असा पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणताही भारतीय फलंदाज करू शकलेला नाही.
नितीश कुमार रेड्डीचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. या खास प्रसंगी मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याचे वडीलही उपस्थित होते. मुलाच्या पहिल्या कसोटी शतकानंतर नितीशचे वडील भावूक झाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्टनेही त्याच्याशी संवाद साधला.
नितीशचे वडील त्याच्या शतकानंतर दबक्या आवाजात म्हणाले, 'तो अंडर-14, अंडर-15 पासून आपल्या राज्यासाठी खेळत होता, आणि आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियासाठी खेळत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खुप खास आहे. गिलख्रिस्टने पुन्हा त्यांना विचारले की, नितीश 99 धावांवर नॉन-स्ट्रायकरवर होता आणि शेवटची विकेट मोहम्मद सिराज स्ट्राइकवर होता, तेव्हा तुम्हाला काय वाटत होते. यावर उत्तर देताना नितीशचे वडील म्हणाले, साहेब खूप टेन्शन होते. फक्त 1 विकेट बाकी होता आणि सिराज स्ट्राईकवर होता, टेन्शन आणि फक्त टेन्शन होतं.
नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा तारणहार ठरला. एकेकाळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांच्या विकेट्समुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता, मात्र त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसह 21 वर्षीय नितीश कुमारने भारताचे पुनरागमन करून दिले. दोघांमध्ये 127 धावांची भागीदारी झाली, त्यामुळे भारताला फॉलोऑनचा धोका टळला.
यासोबतच नितीशच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शतक झळकावणारा नितीश कुमार रेड्डी भारताचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. नितीश कुमार यांनी वयाच्या 21 वर्षे 216 दिवसांत ही कामगिरी केली. त्याच्या आधी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने वयाच्या 18 वर्षे 256 दिवस आणि ऋषभ पंतने 21 वर्षे 192 दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतासाठी कसोटी शतक झळकावले आहेत.
हे ही वाचा -