Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी टीम इंडियाने आखला तगडा प्लॅन! पर्थ कसोटीत गंभीरचा लाडका करणार डेब्यू?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.
India vs Australia Perth 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. नितीश हा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. नितीशला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर ते त्याच्या कारकिर्दीतील कसोटी पदार्पण असेल.
नितीशने टीम इंडियासाठी तीन टी-20 सामने खेळले आहेत. तो आता कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, नितीशला पदार्पणाची संधी मिळू शकते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा उपकर्णधार जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज संघात आहेत. घोट्याच्या दुखापतीनंतर रणजी स्पर्धेत पुनरागमन करणारा मोहम्मद शमी संघाचा भाग नाही. हार्दिक पांड्या कसोटी संघात नसल्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात रेड्डी हा एकमेव वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे.
🚨 NITISH KUMAR REDDY TIME. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 17, 2024
- NKR set to make his Test debut in the 1st Test Vs Australia. (Express Sports). pic.twitter.com/t0yLtDvgZf
भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी झालेल्या शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गंभीर म्हणाला की, शार्दुलऐवजी रेड्डीची निवड करण्याचा निर्णय भविष्याचाही विचार करणे आहे. मला वाटते की आम्ही आमच्यासाठी काम करू शकेल असा सर्वोत्तम संघ निवडला आहे. नितीश कुमार रेड्डीमध्ये क्षमता आहे आणि तो निश्चितपणे भविष्यातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. आम्ही सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे.
आंध्र प्रदेशच्या या अष्टपैलू खेळाडूने 21 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजी करताना त्याने 56 विकेट्सही घेतल्या आहेत. आयपीएलदरम्यान सनरायझर्स हैदराबादकडून खेळतानाही त्याने छाप पाडली.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हे ही वाचा -
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?