Avinash Sable on winning silver at CWG22: बर्मिंगहॅम येथे नुकतीच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (Birmingham 2022 Commonwealth Games) भारतीय खेळाडूंनी दमदार कामिगिरी करून दाखवली. या स्पर्धेत भारतानं 22 सुवर्णपदकासह एकूण 61 पदक जिंकली आहेत. दरम्यान, कॉमनवेल्थ स्टीपलचेस स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) अविनाश साबळेनं (Avinash Sable) मायदेशात परतल्यानंतर आगामी वर्ल्ड चॅम्पियशनशिप आणि ऑलिम्पिकसाठी आपली भूमिका स्पष्ट केलीय. 


अविनाश काय म्हणाला?
एएनआयशी बोलताना अविनाश म्हणाला की, भारतासाठी पदक जिंकून देशात परतताना अभिमानास्पद वाटतंय. या स्पर्धेत माझ्याकडून काही चुका झाल्या. ज्यामुळं मला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपत आणि ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी मी मैदानात उतरेल.


ट्वीट-



अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी
कॉमनवेल्थ स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकून अविनाश साबळेनं इतिहासाला गणवसी घातलीय. भारताला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकवून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातलीय. अविनाशची 3000 मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. त्यानं शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशनं 8:11.20 सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकलं.


ट्वीट-



कॉमनवेल्थ पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर 
बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेच्या अखेरीस भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारतानं यावेळी एकूण 61 पदकांवर नाव कोरलं. ज्यात 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांनाही जगभरात छाप सोडलीय. 


भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी


सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल


रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.


कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन.


हे देखील वाचा-