New Zealand tour of India : भारतीय संघानं (Team India) नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर असून वन-डे मालिका 3-0 ने गमावल्यावर आता टी20 मालिका खेळणार आहे. उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार आहेत.
भारतानं न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 8 गडी राखून जिंकल्यावर तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमक दाखवली. शुभमनंचं द्वीशतक ते सिराजचं एकदिवसीय गोलंदाजाच्या क्रमवारीत टॉप करणं अशा बऱ्याच खास गोष्टी यावेळी घडल्या. दरम्यान आता टी-20 मालिकेत भारत हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू घेऊन उतरणार असून नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगं असेल...तर भारत आणि न्यूझीलंड टी20 सामन्याची माहिती पुढीलप्रमाणे...
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारताचा टी20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 27 जानेवारी 2023 | रांची |
दुसरा टी-20 सामना | 29 जानेवारी 2023 | लखनौ |
तिसरा टी-20 सामना | 01 फेब्रुवारी 2023 | अहमदाबाद |
हे देखील वाचा-