NZ vs NED Match Report : न्यूझीलंडने विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभव केला. मिचेल सँटरनरच्या फिरकीपुढे डचच्या फलंदाजांन लोटांगण घेतले. मिचेल सँटनरने नेदरलँडच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेतील स्थान आणखी मजबूत केले आहे. न्यूझीलंड आणि नेदरलँडचा पराभव करत चार गुणांसह किवी संघ पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 323 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर नेदरलँडला 46.3 षटकांमध्येच 223 धावांत गुंडाळले. न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभव केला. नेदरलँडचा हा सलग दुसरा फराभव होय. याआधी नेदरलँडचा पाकिस्तानने पराभव केला. 


कॉलिन एकरमैनची झुंज, डचच्या इतर फलंदाजांची निराशा -


मिचेल सँटनरच्या भेदक माऱ्यापुढे नेदरलँडच्या संघाला फक्त 223 धावांपर्यंत मजल मारता आली. नेदरलँडकडून कॉलिन एकरमैन याने एकाकी झुंज दिली.  कॉलिन एकरमैन याने 73 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार ठोकले.  डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने 27 चेंडूत 30 चेंडूचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही डच फलंदाजाला मोठी केळी करता आली नाही. स्वस्तात सर्व फलंदाज तंबूत परतले. परणामी न्यूझीलंडचा डाव 223 धावात आटोपला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर याने भेदक मारा केला. सँटनर याने पाच विकेट घेतल्या. तर मॅट हैनरी याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले.  रचिन रवींद्र याला एक विकेट मिळाली. 


न्यूझीलंडचा धावांचा डोंगर - 


नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 322 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज विल यंग याने 80 चेंडूत 70 धावांची खेळी केली. त्याशिवाय कीवी कर्णधार टॉम लेथम याने 46 चेंडूत 53 धावा चोपल्या. तर रचिन रवींद्र याने 51 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. नेदरलँडकडून आर्यन दत्त, वान मीकेरम आणि वान डर मर्व यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर बेस डी लीडे याने एक विकेट घेतली.