New Zealand Win Over England : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात वेलिंग्टनमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडन केवळ एका रनच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. कसोटी सामन्यात असा रोमहर्षक विजय मिळवणं एक मोठी गोष्ट असून विशेष म्हणजे फॉलोऑन मिळूनही सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. या विजयामुळे एका खास क्लबमध्ये किवी संघाने एन्ट्री केली आहे. कसोटी क्रिकेट इतिहासात फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील तिसरा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड आणि भारताने ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या खास विजयामुळे न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे.


सामन्याचा विचार करता आधी इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा करुन किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची मोठी आघाडी घेतली. ज्यानंतर न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य दिलं. शेवटच्या डावात इंग्लंडला 256 धावांवर सर्वबाद करत न्यूझीलंडने सामना जिंकला. विशेष म्हणजे दुसरी कसोटी एका धावेने जिंकून, लाल-बॉल क्रिकेटच्या इतिहासात केवळ चौथ्यांदाच, एखाद्या देशाने फॉलोऑन घेऊनही कसोटी सामना जिंकला आहे. याआधी इंग्लंडने दोन वेळा तर भारताने एकदा ही कामगिरी केली आहे.


फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकलेले संघ


1894 - इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला


1981 - इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 18 धावांनी पराभव केला


2001 - भारताने ऑस्ट्रेलियाचा 171 धावांनी पराभव केला


2023 - न्यूझीलंडने इंग्लंडचा 1 धावाने पराभव केला


कसा होता कसोटीचा अखेरचा दिवस?


पहिल्या डावात 435 धावा करुन इंग्लंडने किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची विशाल आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना 483 धावांचा डोंगर उभारला. ज्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. ज्यानंतर इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिली विकेट गमावली होती. एकूण 39 धावांवर जॅक क्रॉलीच्या (24 धावा) रुपाने पहिली विकेट पडली. खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने एक विकेट गमावून 48 धावा केल्या होत्या. म्हणजेच पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 210 धावा करायच्या होत्या. पण पाचव्या दिवशी इंग्लंडची खराब सुरुवात झाली. ऑली रॉबिन्सन (2), बेन डकेट (33), ऑली पोप (14) आणि हॅरी ब्रूक (0) यांची विकेट लगेच पडली. त्यानंचक जो रुटने कर्णधार बेन स्टोक्ससोबत (33) सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. पण नील वॅगनरच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे रुट, स्टोक्स दोघेही बाद झाले. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये जेम्स अँडरसन संघाला जिंकवून देईल असं वाटत असताना विजयासाठी अजून एक धाव बाकी असताना वॅगनरने अँडरसनला बाद करत सामना न्यूझीलंडला जिंकवून दिला.






हे देखील वाचा-