Kane Williamson Steps Down from Test Captainship: न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket Team) संघाचा दिग्गज फलंदाज (New Zealand Cricketer) केन विल्यमसननं (Kane Williamson) मोठा निर्णय घेतला आहे. विल्यमसननं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनच्या जागी आता अनुभवी गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) न्यूझीलंड कसोटी संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. विल्यमसन एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड क्रिकेट टीमची कमान सांभाळणार आहे. 


हीच योग्य वेळ : केन विल्यमसन


न्यूझीलंड कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर केन विल्यमसननं आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे". कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी बहुमान आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी अव्वल दर्जाचं आहे आणि त्याचा कर्णधार म्हणून मी आव्हानांचा आनंद घेतला. कर्णधार असताना तुमचं काम आणि ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला वाटलं की, कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे."


केन विल्यमसनच्या नेतृत्त्वात न्यूझीलंडला 'कसोटी चॅम्पियन'


केन विल्यमसननं हा न्यूझीलंडच्या महान कसोटी कर्णधारांपैकी एक. खरं तर केनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं भारताचा पराभव करून पहिलं कसोटी विजेतेपद पटकावलं होतं. त्याच्या कर्णधारपदाचा विक्रम पाहता त्यानं 38 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं आहे. ज्यामध्ये त्यानं 22 वेळा संघाला विजय मिळवून दिला असून 8 सामने अनिर्णित राहिले आहेत.




टीम साऊदी नवा कसोटी कर्णधार


केन विल्यमसननं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीला नवा कसोटी कर्णधार बनवण्यात आलं आहे. तो पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर टॉम लॅथम संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंड संघाचा 31वा कसोटी कर्णधार बनला आहे. याआधी तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संघाची कमान सांभाळताना दिसला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


INDW vs AUSW : शेफाली वर्माची अर्धशतकी झुंज व्यर्थ, तिसऱ्या टी20 मध्ये भारताचा 21 धावांनी पराभव