India announce squad for Australia Tests : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. हा दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय संघासाठी  ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकूण 18 खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियाला जाणार असून त्यात 3 राखीव खेळाडूंचाही समावेश आहे. टीम इंडिया शेवटची 2020-21 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यानंतर भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला होता.


गेल्या काही वर्षांपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा दबदबा आहे. भारताने मागील दोन्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकल्या आहे. 2020-21 चा दौरा टीम इंडियासाठी ऐतिहासिक ठरला. या मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले होते. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले होते, आणि पहिल्या सामन्यानंतरच विराट कोहली भारतात परतला होता. या सगळ्या समस्या असतानाही कमी अनुभवी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला. पण त्या दौऱ्यात टीम इंडियाच्या विजयात योगदान दिलेले 11 खेळाडू यावेळी संघात नाहीत.


गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता. मात्र तो फक्त 1 सामना खेळला. यानंतर अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मात्र यावेळी अजिंक्य रहाणे संघात नसल्यामुळे तो काही काळापासून संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. रहाणेशिवाय वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराचीही संघात निवड झालेली नाही. त्याच वेळी, मयंक अग्रवाल, रिद्धिमान साहा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, उमेश यादव आणि टी नटराजन यांचाही या यादीत समावेश आहे, जे मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचा भाग होते.


स्टार फिरकीपटू कुलदीप यादवची दुखापतीमुळे या दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कुलदीप दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि तो बंगळुरूमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली काम करेल. त्याचबरोबर मोहम्मद शमीलाही दुखापतीमुळे या संघात स्थान मिळू शकले नाही. दुसरीकडे शार्दुल ठाकूरलाही ऑस्ट्रेलिया दौऱ्याची संधी मिळालेली नाही. हे तीन खेळाडू 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाचा भाग होते.


हे ही वाचा -


Ind vs NZ: टीम इंडियाला विजयसाठी 359 धावांचं आव्हान; दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण मारणार बाजी?