मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. धोनी पत्नी साक्षी सिंहने यासंदर्भात सोशल मीडियावरु माहिती दिली आहे. साक्षीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साक्षीच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 


महेंद्र सिंह धोनीचं बाईक आणि कुत्र्यांसाठी असलेलं प्रेम जगजाहिर आहे. परंतु, आता धोनीच्या लिस्टमध्ये एक नव्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. धोनीने रांचीमध्ये सात एकर जागेवर फार्महाऊस बांधलं आहे. आयपीएल रद्द झाल्यानंतर फार्महाऊसवर पोहोचताच धोनीने एक काळा घोडा खरेदी केला आहे. धोनीची पत्नी साक्षीने या नव्या पाहुण्याचं स्वागत केलं असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  


धोनीने आपल्या घोड्याचं नाव चेतक ठेवलं आहे. धोनीची पत्नी साक्षीने यासंदर्भातील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. धोनीने लिहिलं आहे की, "चेतक, तुझं आमच्या घरात स्वागत आहे. जेव्हा तू लिलीला भेटलास तेव्हा तू खरंच एका जेंटलमॅनसारखं वागलास. तुझं कुटुंबात स्वागत आहे."



रविंद्र जाडेजानेही खरेदी केले अनेक घोडे


मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नईच्या संघातील स्टार खेळाडू ऑलराउंडर रविंद्र जाडेजा पाळीव प्राण्यांचा शौकीन आहे. जाडेजाकडे काळ्या, पांढऱ्या रंगाचे अनेक घोडे आहेत. त्याने त्याच्या फार्महाऊसवर घोड्यांसाठी एक छोटं स्टड फार्म तयार केलं आहे.   


यंदाच्या सीझनमध्ये सीएसकेची धमाकेदार खेळी 


कोरोनामुळे आयपीएलचा 14वा सीझन रद्द करण्यात आला आहे. या सीझनमधील 29 सामने कोणत्याही संकटाशिवाय पार पडले, पण त्यानंतर मात्र आयपीएलवर कोरोनाची वक्रदृष्टी पडली आणि अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. या सीझनमध्ये चेन्नईच्या संघानं धमाकेदार खेळी केल्याचं पाहायला मिळालं. संघानं सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. यामुळे चेन्नईचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :