IND vs SA, 5th T20: भारत आण दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात उमरान मलिक (Umran Malik) किंवा अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केलं. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत त्यांची निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. महत्वाचं म्हणजे, मालिकेच्या दृष्टीने शेवटचा सामना सर्वात महत्त्वाचा असून हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. अशा परिस्थितीत भारतीय संघात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे.


या मालिकेत अनुभवी खेळाडूंना विश्रांती
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. केएल राहुलही दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडलाय. या मालिकेत भारतासाठी डावाची सलामी देणाऱ्या इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांचीही टीम इंडियात जागा निश्चित झालेली नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊन भविष्यासाठी तयार करण्याचा भारतीय व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल.


भारताचे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये
भारताकडून डावाची सलामी देणारे इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत इशान किशन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत हार्दिक आणि कार्तिकची कामगिरीही उत्कृष्ट झाली. मात्र, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत चहल आणि अक्षर पटेल यांनी खराब सुरुवातीनंतर चांगलं पुनरागमन केलंय. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान हे त्रिकूटही वेगवान गोलंदाजीत सुपरहिट ठरले आहेत. 


भारताचा संभाव्य संघ- 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर) हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान.


हे देखील वाचा-