IND vs SA, 4th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना (India vs South Africa) आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधलीय. आजच्या समान्यात विजय मिळवून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्याकडं विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी उपलब्ध झाली आहे. टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यापासून भुवनेश्वर कुमार एक विकेट्स दूर आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-20 सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा भुवनेश्वर कुमार असणार आहेत. या सामन्यात भुवनेश्वरनं एक विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या भुवी वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.

पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

क्रमांक गोलंदाज विकेट्स
1 सॅम्युअल बद्री   33
2 भुवनेश्वर कुमार  33
3 टीम साऊथी 33
4 शकिब अल हसन 27
5 जोश हेझलवूड 30

भुवनेश्वर कुमारची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली होती. भुवनेश्वर कुमारनं चार षटकात 13 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. मात्र, हेन्रिक क्लासेनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतावर चार विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारनं एक-एक विकेट मिळवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारनं एकूण 269 विकेट्स (कसोटी 63, एकदिवसीय क्रिकेट- 141 आणि टी-20 क्रिकेट-69) घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-