National Sports Awards 2021 Announced :  2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यासह एकूण 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याचाही खेलरत्न पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 जणांची नामंकने होती. मनप्रीत सिंह याचं नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण 12 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. शिखऱ धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.  13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या पुरस्कारांची उशीरा घोषणा झाली आहे. यंदाच्या क्रीडा पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 


पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं – 
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार : नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी).
अर्जुन पुरस्कार: अरपिंदर सिंह (अथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखंब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी)), बीरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पॅरा अथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा शूटिंग), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तीरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अथलेटिक्स).