India Squad For Bangladesh Test Series : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने 16 खेळाडूंचा संघ निवडला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. विराट कोहली आणि केएल राहुलच्या पुनरागमनानंतरही सरफराज खान भारतीय संघातील आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये केल्या 55 धावा
सरफराज खानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताकडून पदार्पण केले होते. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने अर्धशतके झळकावली. यानंतर तिसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतक झळकावले. सरफराज दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ब संघाचा भाग आहे. भारत अ संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 9 धावा आणि दुसऱ्या डावात 46 धावा केल्या. यानंतरही तो टीम इंडियातील आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला.
सरफराज खानचा भाऊ मुशीरने याच सामन्यात भारत अ संघाकडून 181 धावांची खेळी केली होती. भारत अ संघाने 94 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. येथून मुशीर याने नवदीप सैनी सोबत 205 धावांची भागीदारी केली. मुशीरने याआधी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावले होते. या 19 वर्षीय फलंदाजाने रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत द्विशतक झळकावले होते. फलंदाजासोबतच तो एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाजही आहे.
मुशीर खान हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे आणि त्याला टीम इंडियामध्ये स्थान नाही. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा शुभमन गिल स्वतः युवा आहे. फक्त विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळतो. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आहेत. अशा स्थितीत मुशीर खानला आगामी काळात टीम इंडियामध्ये स्थान मिळवणे सोपे जाणार नाही.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
हे ही वाचा -
Jasprit Bumrah : अजित आगरकरची मोठी खेळी; जसप्रीत बुमराहची संघात निवड, पण 'या' पदावरून सुट्टी
IND vs BAN : बीसीसीआयने मोहम्मद शमी, श्रेयस अय्यरला का डावललं? जाणून घ्या कारण