Mumbai vs Rest Of India Irani Cup 2024 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने इराणी ट्रॉफी 2024 वर कब्जा केला आहे. ही स्पर्धा रणजी ट्रॉफी विजेता आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळली जाते. पण सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या डावात सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने 537 धावा केल्या होत्या. अभिमन्यू ईश्वरनच्या 191 धावांच्या खेळीनंतरही रेस्ट ऑफ इंडियाला 416 धावाच करता आल्या. अशाप्रकारे मुंबईला 121 धावांची आघाडी मिळाली, जी विजयात महत्त्वाची ठरली. यानंतर मुंबईने 329 धावांवर दुसरा डाव घोषित केला.


मुंबईसाठी पहिल्या डावात सरफराज खान सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने या सामन्यात 286 चेंडूत 222 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने 97 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 64 आणि तनुष कोटियनने 64 धावा केल्या. या खेळाडूंच्या शानदार खेळीमुळे मुंबई संघाने पहिल्या डावात 537 धावा केल्या. पण त्याआधी मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा पृथ्वी शॉ आणि आयुष महात्रे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर हार्दिक तामोरेही काही विशेष करू शकला नाही. सरफराजने द्विशतक झळकावून मुंबईला सामन्यात परत आणले.  


अभिमन्यू ईश्वरनचे शतक व्यर्थ 


रेस्ट ऑफ इंडियासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्या डावात काही खास करू शकला नाही, तो अवघ्या 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिमन्यू इसवरनने 16 चौकार आणि 1 षटकारासह 191 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 93 धावांची खेळी केली. संघात पुनरागमनाची आशा असलेल्या इशान किशनला केवळ 38 धावा करता आल्या. रेस्ट ऑफ इंडियाचे बाकीचे फलंदाज मात्र फ्लॉप ठरले. या कारणामुळे तिला केवळ 416 धावा करता आल्या. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर उर्वरित भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.




मुंबईने 27 वर्षांनंतर जिंकला इराणी कप 


मुंबईकडून पृथ्वी शॉने दुसऱ्या डावात 76 धावा केल्या. तनुष कोटियनने दुसऱ्या डावात150 चेंडूत 114 धावा केल्या, ज्यात 10 चौकार आणि 1 षटकार आहे. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने 51 धावांचे योगदान दिले. मुंबईने 329 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबई संघाने 27 वर्षांनंतर इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाच्या बाहेर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीमने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. याआधी मुंबईने 1997 मध्ये इराणी क जिंकला होता.


हे ही वाचा - 


Women's T20 World Cup scenario : टीम इंडियाचं गणित बिघडलं; सेमीफायनल खेळण्यासाठी जिंकावे लागणार इतके सामने? जाणून घ्या समीकरण