Mumbai announces squad for Vijay Hazare Trophy 2024-25 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी-2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने काही मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला असून दोन दिग्गजांना संघाचा रस्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती.


पृथ्वी शॉला संघात स्थान मिळालेले नाही. शॉला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले होते. मात्र, तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही. याचा परिणाम असा झाला की, शॉला 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणे याला तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरकडे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे.


मुंबईला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात रहाणेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेने 164.56 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याची सरासरी 58.62 होती.






तर दुसरीकडे, मुंबईच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर पृथ्वी शॉ याने नाराजी व्यक्त केले. सोशल माध्यमावर त्याने आपली खंत बोलून दाखवली. दरम्यान, मुंबईने पहिल्या तीन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 17 खेळाडूंचीनिवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव तसेच, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर या खेळाडूंची निवड कायम ठेवण्यात आली आहे.


मुंबईचं संपूर्ण वेळापत्रक


मुंबई संघासमोर पहिल्या तीन लढतींमध्ये कर्नाटक, हैदराबाद व अरुणाचल प्रदेश या संघाचे आव्हान असणार आहे. पहिला सामना कर्नाटकविरुद्ध 21 डिसेंबरला अहमदाबाद येथे होणार आहे. दुसरा सामना हैदराबादविरुद्ध 23 डिसेंबरला अहमदाबादमध्येच रंगणार आहे. त्यानंतर पुन्हा अहमदाबाद येथेच अरुणाचल प्रदेशविरुद्ध सामना होईल.


मुंबईचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रीश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार (यष्टिरक्षक), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, रॉयस्टन डियास, जुनेद खान, हर्ष तन्त्रा, विनायक भोर.


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?