एक्स्प्लोर

MSD Twitter Verification : ट्विटरकडून एमएस धोनीचं अकाउंट पुन्हा व्हेरिफाइड, ब्लू टिक परत केली

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर खात्यावरून ब्लू टिक हटवण्यात आली होती, पण ती पुन्गा देण्यात आली. मात्र अद्याप यापाठीमागेच कारण ट्विटरने स्पष्ट केलेले नाही.

Twitter Blue Tick : कालपासून अचानक ट्विटर चर्चेत आलं. केंद्र सरकारसोबतच्या विवादानंतर ट्वीटरनं अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या ट्विटर हॅन्डलवरु ब्लू टिक काढून टाकली होती. दरम्यान, काही दिवसानी काहींना ट्विटरनं ब्लू टिक पुन्हा दिली. पण सध्या ट्विटर चर्चेत आलंय ते टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीमुळं. 

काल (शुक्रवारी) दुपारी ट्विटरनं एमएस धोनीच्या ट्विटर अकाउंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. धोनीच्या चाहत्यांनी ट्विटला अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अशातच अनेकांनी असा अंदाज वर्तवला की, महेंद्रसिंह धोनी ट्विटरवर कमी अॅक्टिव्ह असतो, त्यामुळं ट्विटरनं ब्लू टिक काढली असावी. पण, ट्विटरनं धोनीच्या अकाउंटची ब्लू टिक त्याला परत केली आहे. जरी धोनी ट्विटरवर जास्त अॅक्टिव्ह नसला तरी, त्याचे जवळपास 8.2 मिनियन फॉलोअर्स आहेत. 

दरम्यान, मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ब्लू टिक काढून घेतली होती. यापूर्वीही ट्विटरने अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेतली आहे.  काही काळानंतर ब्लू टिक पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे.

काय कारण असू शकते?

गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक ट्विटरने काढून घेतली होती. महेंद्र सिंह धोनीचं ट्विटर अकाऊंटही सध्या सक्रीय असल्याचं दिसत नाही. धोनीच्या अकाऊंटवर 8 जानेवारी 2021 ला शेवटचं ट्वीट पहायला मिळत आहे. या ट्वीटमध्ये धोनी स्ट्रॉबेरीच्या शेतात दिसत असून तो स्टोबेरी खात असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला असून त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. दरम्यान, सर्वाधिक फोलोवर्स असलेल्यांमध्ये धोनीचं ट्विटर हँडल मोडते. धोनीच्या ट्विटरवर सध्या 8.2 मिलीयन फोलोवर्स असून तो फक्त 33 लोकांना फॉलो करत आहे. धोनीने खूप महिन्यांपासून कोणतंही ट्वीट केलं नाही. शिवाय यावर तो सक्रीय देखील दिसत नाही. त्यामुळे ब्लू टिक काढल्याचं बोललं जात आहे.

यापूर्वीही ट्विटर अनेकांचे ब्लू टिक काढलेत

मागच्याच महिन्यात ट्विटरने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर खात्यावरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. ट्विटरने म्हटले आहे की, मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील त्यांच्या हँडलचे नाव बदलणं हे ब्लू टिक काढून टाकण्यामागचे कारण असू शकते. 

ट्विटरवर नेत्याची ब्लू टिक काढून टाकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यातून निळी टिक काढून टाकली होती. नंतर त्याच्या खात्यावर निळी टिक परत आली. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून निळ्या रंगाची टिक काढून टाकण्यात आली होती पण नंतर ती पूर्ववतही करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
Shubman Gill VS Shai Hope : टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
IND vs WI 2nd T20 : रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget