MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या क्रिकेटच्या (Cricket) कामगिरी शिवाय तो त्याच्या स्वभावामुळे देखील अनेकांचा आवडता खेळाडू आहे. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक जुना व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये धोनी त्याच्या सुरक्षारक्षकासोबत बाईकवर दिसत आहे. तो त्याच्या सुरक्षारक्षकाला बाईक वरुन सोडायला आल्याचं या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 


हा धोनीचा एक जुना व्हीडिओ आहे. या व्हीडिओमध्ये तो त्याच्या सुरक्षारक्षकासोबत बाईकवरुन येताना दिसत आहे. धोनी त्याच्या सुरक्षारक्षकाला तो बाईकवरुन सोडून माघारी जातो. हा व्हीडिओ धोनीच्या फार्महाऊसवरचा असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच धोनीच्या चाहत्यांनी या व्हीडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. 


धोनीचे रांचीमध्ये मोठे फार्म हाऊस आहे. माहितीनुसार, धोनीचे हे फार्म हाऊस सुमारे सात एकर परिसरामध्ये पसरलेले आहे. तसेच या फार्म हाऊससाठी धोनीने कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे. अनेकदा तो त्याच्या सुट्ट्यांसाठी या फार्म हाऊसवर येतो. तसेच त्याने त्यांच्या मित्रांना देखील येथे आमंत्रित केले आहे. टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनीही धोनीच्या फार्म हाऊसला भेट दिली आहे.तर धोनीची पत्नी साक्षी ही देखील सोशल मीडियावर फार्म हाऊसचे अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. 






फ्लाईटमध्ये गेम खेळताना दिसला होता धोनी 


धोनी हा कायम साधं आणि सरळ आयुष्य जगणं पसंत करतो. त्याचा हाच स्वभाव त्याच्या चाहत्यांना देखील आवडतो. त्यामुळे त्याच्या साधेपणाचे अनेक प्रत्यय चाहत्यांना नेहमीच येत असतात. एकदा प्रवासादरम्यान धोनी फ्लाईटमध्ये गेम खेळतानाचा व्हीडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याच्या या व्हीडिओला चांगलीच पसंती दर्शवली होती. धोनी फ्लाईटमध्ये चक्क आपल्या टॅबलेटवर आरामात कँडी क्रश खेळत बसला होता.  तेव्हा एअर होस्टेस त्याच्याजवळ आली आणि मिठाई आणि चॉकलेट्सचा ट्रे धोनीसमोर ठेवला. यावर धोनीने ओम्नी डेट्सचे पॅकेट उचलले, त्यानंतर एअर होस्टेसही धोनीशी बोलताना दिसली.


हे ही वाचा :


Indian Womens Cricket Team Coach: मुंबईचा माजी खेळाडू भारतीय महिला संघाला देणार क्रिकेटचे धडे, अमोल मुजुमदारकडे नवी जबाबदारी