ICC T20 WC 2021, NZ Vs SL: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 29 व्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला (ENG Vs SL) पराभवाची धूळ चाखली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करीत इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघ 137 धावांवर ऑल-आऊट झाला. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाला 26 धावांनी विजय मिळवता आलाय.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाकडून जेसन रॉय (6 बॉल 9 धावा), जोस बटलर (76 बॉल 101 धावा), डेविड मलान (8 बॉल 6 धावा), जॉनी बेअरस्टो (1 बॉल 0 धाव), इऑन मॉर्गन (36 बॉल 40 धावा) तर, मोईन अलीने नाबाद 2 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाला 20 षटकात 4 विकेट्स गमावून 163 करता आल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या. तर, दुष्मंथा चमीराला एक विकेट्स मिळवता आली.  


या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाकडून पाथुम निसांका (1 बॉल 1 धाव), कुसल परेरा (9 बॉल 7 धावा), भानुका राजपक्षे (18 बॉल 26) धावा), चरित असलंका (16 बॉल 21 धावा), अविष्का फर्नांडो (14 बॉल 13 धावा), दासुन शनाका (25 बॉल 26 धावा), वानिंदू हसरंगा (21 बॉल 34 धावा), चमिका करुणारत्ने (2 बॉल 0 धाव), दुष्मंथा चमीरा (4 बॉल 4 धावा), महेश थेक्षाना (2 बॉल 1 धाव), लाहिरू कुमारा नाबाद 2 बॉल 1 धाव केली. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघ 137 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लंडकडून मोईन अली, अदिल राशीद आणि क्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, क्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.


संबंधित बातम्या-