MS Dhoni Run Out 2019 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या 2019 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्याची आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. विशेष करुन सामन्यातील एमएस धोनीचा (MS Dhoni) रनआऊट ज्यानंतरच सामना भारताने पूर्णपणे हातातून गमावला होता, तो प्रत्येक भारतीयाला आजही आठवतो. दरम्याना आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादीत षटकांचे सामना सुरु होत असून भारत 18 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत सामने खेळणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघाच्या आठवणीतील सामन्यांबाबत चर्चा होत असताना, न्यूझीलंडचे स्टार खेळाडू जे 2019 च्या सेमीफायनलमध्ये संघात होते, त्यांनी धोनीच्या त्या रनआऊटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओचा टीझर समोर आला असून यामध्ये रनआऊट करणारा गप्टिल, कर्णधार केन, विकेटकिपर टॉम, बोलर साऊदी सारे दिसत आहेत.


व्हिडीओमध्ये कर्णधार विल्यमसन म्हणाला, “मला वाटते की मी मिड-ऑफमध्ये उभा होतो, जिथे मी अनेकदा उभा असतो. सामन्यात धोनीचा रनआऊट एक टर्निंग पॉइंट होता. एवढ्या अंतरावरून सरळ थ्रो मारून मार्टिन गप्टिलने त्याला बाद करण अविश्वसनीय होतं. साहजिकच ही मोठी विकेट होती ज्यामुळे आम्हाला निश्चितपणे सामना जिंकण्याची संधी मिळाली." तर स्वत: गप्टिलनेही धोनी अगदी काही अंतरावरच होता खूप किंचित अंतरामुळे तो बाद झाला, असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.


''धोनी आहे तोवर काहीही होऊ शकते''


तर विकेटकीपर टॉम लॅथम म्हणाला, “मी कुठे होतो? मी स्टंपच्या मागे असायला हवे होते, पण मी चेंडूचा पाठलाग करत होतो. गप्टिलने माझ्या आधी चेंडू पकडला, त्यामुळे मला आशा होती की स्टंपवर कोणीतरी असेल पण तो थेट स्टंपला मारण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे आम्हाला विकेट मिळाली.'' तर गोलंदाज टीम साऊदी म्हणाला, “एवढ्या अंतरावरून यष्टीमागे मारणे गप्टिलसाठी खूप खास होते. महेंद्रसिंह धोनीविरुद्ध खेळलेल्यांना माहीत आहे की जोपर्यंत तो आहे तोपर्यंत काहीही शक्य आहे. तो तिथे असताना भारताला संधी होती त्यामुळे तो रनआऊट एक मोठा क्षण होता आणि ती विकेट खूप खास होती.


पाहा VIDEO-






हे देखील वाचा-