MS Dhoni and Rohit Sharma :  भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा सवाल विचारताच अनेकांना सर्वप्रथम महेंद्रसिंग धोनीचे नाव आठवते. एम एस धोनीने भारताला एकदा टी 20 विश्वचषक जिंकून दिलाय. तर एकदा 50 षटकांच्या विश्वचषकावरही धोनीच्या नेतृत्वात भारताने नाव कोरले आहे. शिवाय, 2013 मध्ये धोनी कर्णधार असतानाच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. धोनी शिवाय, कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्या नावांचीही यशस्वी कर्णधार म्हणून चर्चा असते. मात्र, ट्रॉफीचा विचार न करता विजयाच्या टक्केवारीवर विचार केला तर रोहित शर्मा सर्वांपेक्षा सरस ठरतोय. 


रोहित शर्माने 2007 मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले. त्याने कारकिर्दीची सुरुवात टी20 क्रिकेटमधून केली. त्यामुळे त्याच्या कॅप्टनशीपबाबतही याच फॉर्मेटने सुरुवात करुयात. रोहितने 54 टी 20 सामने खेळले आहेत. त्यातील 41 सामन्यात भारताने विजय मिळवलाय. रोहितच्या नेतृत्वात भारताने 76.85 टक्के सामने जिंकले आहेत. हे कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा चांगले आहे.  आपण यशस्वी कर्णधारांचा विचार करताना ज्यांनी कर्णधार म्हणून कमीतकमी 10 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलय. अशा कर्णधारांचाच आपण विचार करणार आहोत. 


4 कर्णधार ज्यांनी केलय 10 पेक्षा जास्त टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृ्त्व 


टी 20 फॉरमॅटमध्ये 10 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारे 4 कर्णधार आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा समावेश आहे. धोनीच्या नेतृ्त्वात भारताने 71 पैकी 41 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात 50 पैकी 30 सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय. तर हार्दिक पंड्याने 16 पैकी 10 सामन्यांत विजय मिळवून दिलाय. विजयाची टक्केवारी पाहिली तर हार्दिक पंड्या 65 टक्के, विराट कोहली 64 टक्के आणि महेंद्रसिंग धोनी 59 टक्के अशी आहे. त्यामुळे रोहित शर्मा सर्वांपेक्षा सरस ठरतोय. 


वनडेमध्ये रोहितला 77 टक्के यश 


रोहित शर्माने 45 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी 34 सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 77.27 टक्के सामने जिंकले आहेत. इतर कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या स्थानावर विराट कोहली (70.43%) आणि तिसऱ्या स्थानावर शिखर धवन (70.00%) आहे. कर्णधार म्हणून कोहलीने 95 पैकी 65 सामने जिंकले आहेत आणि धवनने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत.एमएस धोनीने 59.52% आणि कपिल देवने 54.16% सामने जिंकले आहेत. धोनीने 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, त्यापैकी 110 सामने त्याने जिंकले. कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने 74 पैकी 39 सामने जिंकले. रोहित आणि कोहली व्यतिरिक्त, फक्त शिखर धवन (12 पैकी 7) त्याच्या नेतृत्वाखाली भारताचे 70.00% सामने जिंकू शकले आहेत. इतर सर्व कर्णधारांचे यश 70.00% पेक्षा कमी आहे.


कसोटी क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहलीने सर्वाधिक 68 सामन्यांचे नेतृत्व केले आहे आणि सर्वाधिक 40 सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची विजयाची टक्केवारी 70 आहे. रोहित शर्मा (69.23%) विराटच्या खूप जवळ आहे आणि धर्मशाला कसोटी जिंकून विराटला मागे सोडण्याची शक्यता आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 15 पैकी 9 सामने जिंकले आहेत. कसोटी सामन्यांतील विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत सौरभ गांगुली (61.76%) तिसऱ्या स्थानावर, एमएस धोनी (60.00%) चौथ्या स्थानावर आणि राहुल द्रविड (57.14%) पाचव्या स्थानावर आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!