Ranji Trophy 2022 Final: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्राफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रेदशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे. मध्य प्रदेशकडून यश दुबे आणि शुभन शर्मानं शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणलंय. मध्य प्रदेशसाठी यश दुबेनं 133 आणि शुभन शर्मानं 116 धावा करून संघासाठी मोठं योगदान दिलं. सध्या रजत पाटीदार मध्य प्रदेशच्या संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं नाबाद 67 धावांची खेळी केली. त्याच्यासोबत अदित्य श्रीवास्तव नाबाद 11 धावा करून क्रिजवर उभा आहे.


मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थितीत
मुंबईच्या संघाला 374 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेशच्या संघाला सुरुवातीलाच हिमांशूच्या रुपात पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्मानं संघाचा डाव सावरला आणि संघाला मजबूत स्थितीण आणलं. यश दुबे आणि शुभम शर्मा आऊट झाल्यानंतर रजत पाटीदारनं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि शाम्स मुलानीला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. दरम्यान, मुंबईच्या संघानं पहिल्या डावात 374 धावा केल्या. मुंबईकडून सर्फराजनं 134 धावा केल्या. तर, सलामीवीर यशस्वी जैस्वालनं संघासाठी 78 धावांचं योगदान दिलं. 


हे देखील वाचा-