Most Runs in ICC Cricket World Cup 2023 : भारतात सुरु असलेल्या विश्वचषक मध्यवर आला आहे. आतापर्यंत या विश्वचषकात फलंदाजाचे वर्चस्व पाहायला मिळाले. धावांचा पाऊस पडलेला पाहिलाय. या विश्वचषकात अनेक विक्रम झाले आणि तुटलेही... या विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा बोलबाला दिसलाय. दोन्ही संघ फॉर्मात असून सेमीफायनलच्या दिशेने पावले टाकली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदजांनी यंदाच्या विश्वचषकात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. चौकार आणि षटकारांचा पाऊस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाडलाय. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचाही समावेश आहे. क्विंटन डिकॉक पहिल्या स्थानावर पोहचलाय. याआधी विराट कोहली पहिल्या स्थानावर होता, पण डिकॉकने बांगलादेशविरोधात शतकी खेळी करत अव्वल स्थान पटकावले आहे. 


यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक वेळा दक्षिण आफ्रिकेने 300 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आफ्रिकेने एकवेळा 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. एकवेळा 399, 382 धावांचा डोंगर उभारलाय. मंगळवारी बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेताना आफ्रिकेने 382 धावा चोपल्या होत्या. या सामन्यात क्विंटन डिकॉक याने 174 धावांची शानदार खेळी केली होती. डिकॉक यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. 


किंग कोहलीला टाकले मागे - 


बांगलादेशविरोधात 174 धावांची खेळी करत क्विंटन डिकॉकने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकले. क्विंटन डिकॉकने 81.40 च्या सरासरीने 407 धावांचा डोंगर उभारलाय. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 39 चौकार आणि 15 षटकार निघाले आहेत. विराट कोहलीने 118 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकाचे तीन आणि भारताच्या दोन फलंदाजांचा समावेश आहेत. 


2023 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा 10 फलंदाज - 


1- क्विंटन डिकॉक (दक्षिण अफ्रीका)- 407 रन


2- विराट कोहली (भारत)- 354 रन


3- रोहित शर्मा (भारत)- 311 रन


4- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- 302 रन


5 - डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 301


6- रचिन रविंद्र (न्यूझीलंड)- 290 रन


7- हेनरिक क्लासेन (दक्षिण अफ्रीका)- 288 रन


8- डेरिल मिचेल (न्यूझीलंड) -268


9- एडेन मार्करम (दक्षिण अफ्रीका)- 265 रन


10- अब्दुल्ला शफीक (पाकिस्तान)- 255 रन


11- डेवोन कॉनवे (न्यूझीलंड)- 249 रन