क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सध्या चौकार आणि षटकारांची आतषबाजी सरु आहे. या वर्ल्डकपमध्ये विश्वविजेत्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने निराशा केली असली, तरी इंडिया, न्यूझीलंड, नेदरलँड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेनं आपल्या कामगिरीने धडकी भरवली आहे. 


वर्ल्डकपमध्ये 45 नंबरचा जर्सी असाही जलवा!


चालू स्पर्धेत विशेष करून वर्ल्डकपमध्ये 45 नंबरचा जर्सीचा चांगलाच राहिला आहे. या जर्सीचा नंबर अर्थातच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा परिधान करतो. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी रोहित शर्माने एका खास यादीत आपले स्थान निर्माण केले. रोहित शर्मा एका कॅलेंडर वर्षात 50 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला. या वर्षात आतापर्यंत रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये 52 षटकार मारले आहेत. रोहित शर्मापूर्वी केवळ ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सने एका कॅलेंडर वर्षात 50 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.






रोहित शर्मा केवळ तिसरा फलंदाज


एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 59 षटकार मारले होते. यानंतर वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलने एका कॅलेंडर वर्षात 50 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. ख्रिस गेलने 2019 मध्ये 56 षटकार ठोकले. मात्र, या विश्वचषकात एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल मागे राहू शकतात. रोहित शर्मा या विश्वचषकात अफलातून कामगिरी करत आहे. या विश्वचषकात रोहित शर्माने 5 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. रोहित शर्माची सरासरी 62.00 राहिली आहे. 


हेनरिक क्लासेनची सुद्धा दमदार कामगिरी 


दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन चालू वर्ल्डकपमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. तो सुद्धा 45 नंबरची जर्सी परिधान करतो. या वर्षात आतापर्यंत हेनरिक क्लासेनने 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हेनरिक क्लासेनने या 15 सामन्यात 815 धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेनची सरासरी 58.21 तर त्याचा स्ट्राइक रेट 151.20 आहे. याशिवाय हेनरिक क्लासेनने यंदा 3 शतके झळकावली आहेत. तसेच दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.


2023 मध्ये हेनरिक क्लासेनच्या बॅटमधून 69 चौकार लागले असून 40 षटकार मारले आहेत. हेनरिक क्लासेन या विश्वचषकात सातत्याने चमकदार फलंदाजी करत आहे. हेनरिक क्लासेनने बांगलादेशविरुद्ध 49 चेंडूत 90 धावांची खेळी केली. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 2 चौकार आणि 8 षटकार मारले. याआधी हेनरिक क्लासेनने इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. हेनरिक क्लासेनने इंग्लंडविरुद्ध 67 चेंडूत 109 धावा केल्या होत्या. त्या डावात त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले.


या विश्वचषकात हेनरिक क्लासेनची कामगिरी अशीच आहे


या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात हेनरिक क्लासेनने श्रीलंकेविरुद्ध 20 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 27 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्या सामन्यात हेनरिक क्लासेनने 28 चेंडूत 28 धावांची खेळी केली होती. मात्र, विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये हेन्रिक क्लासेन सहाव्या क्रमांकावर आहे. या विश्वचषकात आतापर्यंत हेनरिक क्लासेनने 5 सामन्यात 57.60 च्या सरासरीने 288 धावा केल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या