India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात चेन्नईतील चेपॉक मैदानात पहिला कसोटी सामना सुरु आहे. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या असून बांगलादेश सध्या फलंदाजी करत आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. बांगलादेशने 40 धावांवर झटपट 5 विकेट्स गमावल्या. भारताकडून आकाश दीपने 2, जसप्रीत बुमराहने 2, रवींद्र जडेजाने 2 आणि मोहम्मद सिराजने विकेट पटकावली. सदर वृत्त लिहून पूर्ण होईपर्यंत बांगलादेशने 92 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. बांगलादेशकडून अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही अपयश आले. 


बांगलादेशचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात (Ind vs Ban) उतरला तेव्हा पूर्णपणे भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीपने (Akash Deep) टिच्चून मारा केला. भारतीय वेगवान गोलंदाजांची ही कामगिरी पाहून भारतीय संघाचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) खूप आनंदी झाला. भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेट्स घेतल्यानंतर मॉर्नी मॉर्केलने टाळ्या वाजवत कौतुक केले. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच मॉर्नी मॉर्केलला टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. मॉर्नी मॉर्केल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत टीम इंडियासोबत काम करताना दिसेल. 










मॉर्नी मॉर्केलची कारकीर्द-


मॉर्नी मॉर्केलची कसोटी कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याने 86 सामन्यात 309 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 23 धावांत 6 विकेट्स घेणे ही एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मॉर्नी मॉर्केलने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट्स घेतल्या आहेत. तर 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 47 विकेट्स, घेतल्या आहेत. मॉर्केलने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.


पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक म्हणून बजावली भूमिका-


मॉर्केल पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही राहिला आहे. यासोबतच त्याचा आयपीएल संघ लखनौ सुपर जायंट्सच्या कोचिंग स्टाफमध्येही समावेश करण्यात आला होता. मॉर्केल आणि गंभीर यांनी 2022-23 मध्ये लखनौसाठी एकत्र काम केले आहे. मॉर्केल दक्षिण आफ्रिका 20 लीगमध्ये देखील डर्बन सुपर जायंट्सचे प्रशिक्षक होता.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: पहिले जसप्रीत बुमराह, मग आकाश दीप; बांगलादेशच्या 3 फलंदाजांची दांडी गुल, स्टम्प उडाले, Video


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?