Mohammed Siraj -Travis Head Controversy IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून टीम इंडियाला बॅकफूटवर आणले. डाव्या हाताच्या फलंदाजाने स्फोटक शैलीत फलंदाजी करताना 140 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मैदानावर दोघांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा हेडला या वादामागील कारण विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी मोठे वक्तव्य केले.
सिराजने क्लीन बोल्ड केल्यानंतर त्याच्या आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये सिराज हेडला काहीतरी बोलताना दिसत होता, त्यानंतर सिराजनेही मैदान सोडण्याचा इशारा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड याने पत्रकार परिषदेत सिराजसोबत झालेल्या वादावर वक्तव्य केले. ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत सिराजच्या मुद्द्यावर सांगितले की, मी 'वेल बाउल'शिवाय काहीही बोललो नाही.
सिराजने सांगितले सत्य
स्टार स्पोर्ट्सच्या हेडच्या या उत्तरावर हरभजन सिंगने सिराजला विचारले असता त्याने वेगळेच उत्तर दिले. सिराज म्हणाला की, ते तुम्ही टीव्हीवर पाहू शकता. तो पत्रकार परिषदेत चुकीच बोलला आहे, तो मला वेल बॉल म्हणाला नाही. आम्ही सर्वांचा आदर करतो. क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. तो ज्या पद्धतीने बोलला त्यावर मीही तशीच प्रतिक्रिया दिली.
पुढे, हरभजन सिंग देखील त्याच्या समर्थनात दिसला आणि म्हणाला की, काही हरकत नाही, हे येथे होत आहे. याआधीही माझ्यासोबत अनेक गोष्टी घडल्या आहेत, खेळत राहावे लागेल.
ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळे टीम इंडिया बॅकफूटवर
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांवरच आटोपला होता. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर भारताने पाच विकेट्सवर 128 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा -