Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) रोज बिर्यानी खातो अशा चर्चा सातत्याने सोशल मीडियावर सुरु असतात. अनेकदा समालोचक देखील यावर भाष्य करताना दिसले आहेत. अनेक मोहम्मद शमी रोज एक किलो मटण खातो, अशी अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, खुद्द मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्यांच्या डायटबाबत भाष्य केलंय. 



नवज्योत सिंग सिद्धूंशी बोलताना मोहम्मद शमीचे मोठे खुलासे 


मोहम्मद शमीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्रुप स्टेजचे सामने सुरु असताना माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिंद्धू आणि आकाश चोप्रा यांच्याशी बातचीत केली होती. यावेळी त्याने त्याच्या डायटबाबत मोठे खुलासे केले होते. नवज्योत सिंग सिद्धू यावेळी बोलताना म्हणाले होते की, आयुष्यात अंगावरचं कर्ज कमी करणे आणि वजन घटवणे या सर्वात कठीण गोष्टी असतात. तू वजन घटवण्यासाठी काय केलं? असा सवालही सिद्धू यांनी विचारला होता. 


मोहम्मद शमी काय काय म्हणाला? 


दरम्यान, मोहम्मद शमी याबाबत बोलताना म्हणाला, मी 9 किलो वजन घटवलंय. स्वत:ला चॅलेंज करणे ही सर्वांत कठीण गोष्ट असते. एनसीएमध्ये होतो, तेव्हा फार कठीण काळ होता. माझं वजन 90 किलो झालं होतं. माझ्या जीभेवर माझा कंट्रोल आहे. मी गोड खाणे टाळत असतो. ज्या गोष्टी खायच्या नाहीत, त्यापासून मी नेहमी दूर राहतो. मी त्या सर्व गोष्टींपासून मी लांब राहतो. पण कधीकधी बिर्यानी खायला काय हरकत आहे? मी रोज केवळ डिनर करतो. ब्रेकफास्ट आणि लंच देखील करत नाही. या गोष्टी करणे फार अवघड आहे...मात्र, सवय झाल्यानंतर अवघड वाटत नाही. 


सध्या मोहम्मद शमी रोजा वादात अडकल्याचं चित्र आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया झालेल्या सामन्यादरम्यान, मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. त्यामुळे त्याने रोजा पाळला नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. शिवाय मोहम्मद शमीने धर्मापेक्षा देशाला महत्त्व दिलं, असंही सोशल मीडियावर म्हटलं गेलं आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मात्र, दुसरीकडे भारतातील काही मौलानांना मोहम्मद शमीने रोजा पाळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता जावेद अख्तर देखील शमीच्या समर्थनार्थ मैदानात उतरलं आहेत. अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला जावेद अख्तर यांनी मोहम्मद शमीला दिलाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!