mohammed shami : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जातोय. दरम्यान, दुबईत खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यादरम्यान, टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आलीये. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झालाय. सातव्या षटकादरम्यान कॅच पकडण्याचा प्रयत्न करत असाताना तो जखमी झालाय. यावेळी शमीच्या बोटांतून भळाभळा रक्त वाहिल्याची माहिती आहे. त्यानंतर शमीला टीम इंडियाच्या फिजीओची मदत घ्यावी लागली आहे. त्यानंतर शमी दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानात आलेलाही पाहायला मिळालाय. त्यामुळे भारताला थोडासा दिलासा मिळालाय. 




कॅच सुटल्याने रोहित शर्मा नाराज ?


मोहम्मद शमी टीम इंडियाकडून 7 वे षटक टाकत असताना तिसऱ्या चेंडूवर रचिनने एक जोरदार शॉट मारला. यानंतर मोहम्मद शमीने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉल शमीच्या बोटांना लागून हवेत गेला. कॅच घेण्यासाठी शमीने चांगले प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र तो झेल पकडू शकला नाही, उलट त्याच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. 
संपूर्म चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान, रचिनने चांगली कामगिरी केली आहे.  त्याने 75 च्या सरासरीने 200 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला आणखी एक संधी देणे टीम इंडियासाठी घातक ठरु शकले असते. मात्र, तो स्वस्तात माघारी परतलाय. 


मोहम्मद शमी नंतर श्रेयस अय्यरनेही रचिन रवींद्रचा कॅच सोडल्याचं पाहायला मिळालं होतं. पहिल्यांदा कॅच सुटल्यानंतर रचिनने 21 चेंडूमध्ये 29 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच षटकात ही संधी मिळाली होती.  8 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रचिनने मोठा शॉट मारला होता. त्यावेळी श्रेयस अय्यरने कॅच सोडल्याचं पाहायला मिळालं होतं. 


कुलदीप यादवने रचिन रवींद्रला तंबूत धाडले 


मात्र, रचिन रवींद्रला दोन संधी देऊनही टीम इंडियाचे फारसे नुकसान झाले नाही. त्याला 29 चेंडूत 37 धावा करता आल्या. याचा अर्थ पहिला झेल सुटल्यानंतर त्याने 8 धावा केल्या. यानंतर 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने त्याचा डाव संपवला. रचिनला कुलदीपचा चेंडूवर स्वत:ला वाचवता आलं नाही आणि तो बोल्ड झाला.




इतर महत्त्वाच्या बातम्या 


IND vs NZ Final : कुलदीप यादवच्या गुगलीत रचिन रवींद्र, केन विल्यमसन 'चारों खाने चित्त'; रोहित शर्माच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन व्हायरल