India vs Bangladesh: भारत आणि बांग्लादेश यांच्यात (Ind vs Ban) नुकतीच कसोटी मालिका झाली. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. कानपूर कसोटीत बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने रोहित शर्माला दोन्ही डावात बाद केले होते. आता कसोटी मालिका संपल्यानंतर मेहदी हसनने (Mehidy Hasan) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) खास बॅट भेट दिली आहे. यादरम्यानचा एक मेजशीर व्हिडीओ समोर आला आहे.
मेहदी हसन अन् रोहित शर्माचा व्हिडीओ-
मेहदी हसन मिराजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एक-एक बॅट भेट दिली. रोहित शर्माला बॅट देताना मेहदी म्हणाला, "मी रोहित भाईसोबत आहे आणि मी त्यांना माझ्या कंपनीची बॅट भेट दिली आहे. हे माझे स्वप्न होते आणि आता मी खूप आनंदी आहे. रोहितने मेहदीला त्याच्या नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छाही दिल्या आणि म्हणाला, "मी मेहदीला बऱ्याच काळापासून ओळखतो. तो एक महान क्रिकेटर आहे आणि मला अभिमान आहे की त्याने स्वतःचा बॅटचा व्यवसाय सुरू केला आहे. मी त्याला शुभेच्छा देतो, त्याची कंपनी खूप यशस्वी होईल, असंही रोहित शर्माने सांगितले.
मेहदी हसन अन् विराट कोहलीचा व्हिडीओ-
मेहदी हसन विराट कोहलीला बॅट देत होता, तेव्हा कोहली बंगालीमध्ये म्हणाला "MKS बॅट खूब भलो अची" त्यानंतर दोघेही हसायला लागले. तेव्हा विराट कोहली म्हणाला, "ही खूप चांगली बॅट आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही लोक उत्तम बॅट बनवत आहात आणि त्या सर्व क्रिकेटपटूंसाठी बनवत राहा, असं कोहली म्हणाला. यावेळी कोहलीच्या बंगाली भाषेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मेहदी हसनने सुरु केला व्यवसाय-
मेहदी हसन मिराजने आपल्या मित्रांसोबत बॅट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. एमकेएस स्पोर्ट्स असे त्याचे नाव आहे. मेहदी हसन एमकेएस स्पोर्ट्सच्या सोशल मीडिया पेजवर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
संबंधित बातमी:
माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता क्रिकेटपटू जडेजा; लग्नाचीही तयारी झाली, पण एक घटना अन् The End