150 Years Of Test Cricket : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुना फॉरमॅट म्हणजे कसोटी. खेळाडूंची खरी टेस्ट कसोटीच्या फॉरमॅटमध्येच होते. येथे खेळाडूंचे क्रिकेट कौशल्य आणि संयम याची कसोटी लागते. आयसीसीने आतापर्यंत केवळ 12 देशांना कसोटी खेळणारे देश म्हणून मान्यता दिली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च 1877 मध्ये मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. 2027 मध्ये कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत आहेत.


2027 मध्ये जेव्हा कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे (या मैदानावर पहिली कसोटी खेळली गेली होती). कसोटी क्रिकेटच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.


याशिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2024-25 ते 2030-31 या कालावधीतील इतर सामन्यांसह पुढील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी यजमान कोणाकडे असेल हे पण निश्चित केले आहे.  






क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, “आम्हाला पुढील होस्टिंग अधिकारांची पुष्टी करताना आनंद होत आहे, जेथे पुढील सात वर्षांत नेत्रदीपक क्रिकेट पाहिला मिळेल. आम्हाला विश्वास आहे की हा कार्यक्रम प्रतिष्ठित कसोटी सामन्यांसह देशभरातील सर्वोत्कृष्ट ठिकाणी क्रिकेट योग्य वेळी खेळला जाईल. आमचा विश्वास आहे की ही योजना क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्तम कार्यक्रम प्रदान करते.


ते पुढे म्हणाले की, मार्च 2027 मध्ये MCG येथे होणारा 150 वा वर्धापन दिन कसोटी सामना हा जगातील महान क्रीडांगणांपैकी एकावर खेळाच्या शिखर स्वरूपाचा एक विलक्षण उत्सव असेल आणि त्या निमित्ताने इंग्लंडचे यजमानपद मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. कसोटी स्वरूपाचा पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. जो ऑस्ट्रेलियन संघाने 45 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्ह ग्रेगरी होता. इंग्लंडची कमान जेम्स लिलीव्हाइटच्या हाती होती.



संबंधित बातमी :


WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला खेळावा लागणार मोठा गेम; जाणून घ्या काय आहे नेमकं गणित


दक्षिण अफ्रिकेने मालिका जिंकली; WTCच्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकलं, टीम इंडिया कितव्या स्थानावर?


विकेटकीपिंग सोडली अन् थेट गोलंदाजीसाठी आला; ऋषभ पंतने पहिला चेंडू टाकताच खेळ खल्लास, video