दक्षिण अफ्रिकेने मालिका जिंकली; WTCच्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकलं, टीम इंडिया कितव्या स्थानावर?
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेट संघ 9 मॅचपैकी 6 मॅच जिंकत 68.51 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या या विजयानंतर जागतिक अजिंक्य कसोटी स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत बदल झाला आहे.
भारतानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून त्यांचे गुण 62.5 इतके आहेत.
तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ असून त्यांचे 50 गुण आहेत. तर 50 गुणांसह श्रीलंकेचा संघ देखील चौथ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ 38.89 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 36.66 सहाव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा संघ 36.54 गुणांसह सातव्या क्रमांकावर, तर बांगलादेशचा संघ 25 गुणांसह आठव्या स्थानावर असून वेस्ट इंडिजचा संघ 18.52 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
भारतानं यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
मात्र, भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं होतं. पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामना खेळतील.