Sandeep Patil On MCA Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep Patil) यांचा प्रचार अगदी जोमानं सुरु आहे. येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली. यापूर्वी संदीप पाटील यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी एमसीए, शरद पवार यांसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
जेवढा बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल तेवढी जिंकायला मजा येते
"क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चांगली टीम जिंकावी त्याच पद्धतीने जे बेस्ट उमेदवार आहेत ते जिंकावे ही अपेक्षा आहे.तीन वर्षांपूर्वी सुद्धा मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलो होतो पण मला चुकीच्या पद्धतीने त्यावेळेला बाद केलं होतं. शिवाजी पार्कचा खेळाडू म्हणून मी सांगेल की जेवढा बलाढ्य प्रतिस्पर्धी असेल तेवढी जिंकायला मजा येते. आमच्या संघाकडून चांगला खेळ होईल आणि आम्हाला विजय मिळेल अशी अपेक्षा आहे.पवार पॅनल का दूर झालं याची मला कल्पना नाही कारण मी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हे सगळे निर्णय झाले होते", असं संदीप पाटील यांनी म्हटलंय.
मुंबई क्रिकेटचा भलं करण्यासाठी मैदानात उतरलोय
"मुंबई क्रिकेटचा भलं करण्यासाठी म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मुंबईचा क्रिकेट चांगलं करण्यासाठी मी मैदानात आहे. मी राजकारणाचा फार विचार करत नाही कारण राजकारण मला कळत नाही. राजकारण दूर ठेवून मी क्रिकेटचा विचार करणारा माणूस आहे. माझ्या हातामध्ये इंडियाची शान असलेल्या कॅप आहे. या कॅपची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत ही कॅप आहे तोपर्यंत मी मुंबईच्या क्रिकेटसाठी लढत राहील", असंही संदीप पाटील यांनी म्हटलंय.
शरद पवारबाबत संदीप पाटील काय म्हणाले?
"मुंबईच्या क्रिकेटची परतफेड करण्याची संधी मला मिळाली तर मला खूप आनंद होईल. शरद पवार यांची भेट किंवा बोलणं गेल्या दहा वर्षात झालं नाही, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा मुंबई आणि भारतीय क्रिकेटमध्ये योगदान आहे. त्यांनी कुठे जायचं? हा त्यांचा निर्णय आहे आणि मी कुठे राहायचं? हा माझा निर्णय आहे. त्यांनी मुंबई क्रिकेटसाठी केलं आता मी मुंबई क्रिकेटसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी मी उभा आहे."
हे देखील वाचा-