Most Runs In T20 World Cup 2024 :  टी 20 विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत. वॉर्मअप सामन्याला सुरुवातही झाली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) 20 संघ सहभागी झाले असून स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. दोन जूनपासून विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच विश्वचषकासंदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवते जात आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा कोण काढणार ? याचे सर्वजण तर्कवितर्क लावत आहे. क्रिकेटमधील दिग्गजांनाही हा प्रश्न विचारण्यात आलाय. अनेकांनी विराट कोहील याच्याच नावाला पसंती दर्शवली. रनमशीन विराट कोहली यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढेल, असं अंदाज दिग्गजांनी वर्तवलाय. 


विराट कोहलीला रोखणं कठीण 


यंदाच्या टी20 विश्वचषकात कुणाचा जलवा असेल? कोणता फलंदाज यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाऊस पाडेल? याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन, भारताचे माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ आणि एस. श्रीसंत यांनी आपला अंदाज व्यक्त केलाय. हेडन, कैफ अन् श्रीसंत यांनी एकच सूरात विराट कोहलीचं नाव घेतले. तिघांच्या मते यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीला रोखणं कठीण असेल. विराट कोहली खोऱ्याने धावा काढेल. त्याचा फॉर्म पाहाता प्रतिस्पर्धी संघावर तो तुटून पडू शकतो. 


आयपीएलमध्ये विराट कोहलीचा जलवा 


विराट कोहलीनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. विराटनं 15 मॅचमध्ये 61.75 च्या सरासरीनं  154.70 च्य स्ट्राइक रेटनं 741 धावा केल्या. विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाली. मात्र, विराट कोहलीचं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप च्या लिस्ट मध्ये पहिल्या स्थानवर राहिला. विराट कोहलीने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली. त्याशिवाय विराट कोहलीच्या बॅटमधून  38 षटकारही निघाले. 


टी20 विश्वचषकात विराट कोहलीच किंग - 


2007 मध्ये टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पहिल्या विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले. त्या संघाचा विराट कोहली सदस्य नव्हता. पण विराट कोहलीच्या नावावर टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा आहेत. 20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने 27 सामन्यातील 25 डावात फलंदाजी केली. विराट कोहलीने 131 च्या स्ट्राईक रेटने 25 डावात 1141 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजे, प्रत्योक दुसऱ्या डावाला विराट कोहलीच्या बॅटमधून अर्धशतक येते. टी20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर 28 षटकार आणि 103 चौकारांची नोंद आहे. टी20 मध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 इतकी आहे. 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि अवेश खान