Valentines Day : आज 14 फेब्रुवारी म्हणजेच जगभरातील तरुण वर्ग व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा करत आहे. विशेष म्हणजे हा खास दिवस साजरा करण्यात करण्यात क्रिकेटर्सही मागे नाहीत. युवराज सिंग, दीपक चहर, जसप्रीत बुमराहसह डेव्हिड वॉर्नरसारख्या परदेशी खेळाडूंसग अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. यासोबतच त्यांनी आपआपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने खास पोस्ट शेअर केली आहे.






 


जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनची खास पोस्ट


भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने तिचा आणि जसप्रीतचा एक खास ट्रेडिशनल कपड्यांमधील ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. ज्यात 'या व्यक्तीसाठी दिवसभर मी लव्ह इमोजी शेअर करेन' असं म्हटलं आहे.






परदेशी खेळाडूंनी ही साजरा केला व्हॅलेंटाईन डे


भारतीय क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, परदेशी खेळाडूंनी त्यांच्या पत्नी आणि मैत्रिणींसोबत हा खास दिवस साजरा केला आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी आपापल्या पत्नींसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोशल मीडियावर आपापल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करून हा खास दिवस साजरा केला. विशेष म्हणजे, सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारतात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि 132धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.






हे देखील वाचा-