IPL 2024 : आयपीएल 2024 ने (IPL 2024) संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. नुकताच आयपीएलचा लिलावही (IPL Auction) पार पडला आहे. यंदाच्या लिलावात कोट्यावधींची बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क (mitchell starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. तर मुंबईने हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. आता या मालिकेतून पाच खेळाडू बाहेर पडू शकतात, अशी माहिती मिळत आहे. हे पाच खेळाडू कोण? जाणून घ्या.


नवीन उल हक (Naveen-ul-Haq)


लखनऊ सुपरजायंट्स संघाचा नवीन उल हक आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नवीन उल हकने आपले नाव सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेऊ नका असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला म्हटले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेले नाही. तसेच त्याला NOC देण्यासदेखील अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे.


सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)


साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान सुर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सूर्या वॉकरच्या सहाय्याने चालताना दिसून येत आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही याबाबत अजून कुठलीही शास्वती नाही. 


महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni)


मागील वर्षी झालेल्या आयपीएलच्या मालिकेत महेंद्रसिंह धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. तो जेव्हा त्याच्या गावी गेला होता, तेव्हा त्याला पायऱ्या उतरतानादेखील त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने त्याला आगामी हंगामासाठी रिटेन केले आहे.


मोहम्मद शमी (Mohammed Shami)


यावर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीचा बोलबाला दिसून आला. मात्र त्यानंतर शमी खेळण्यासाठी पूर्णतः फिट नाही. त्याला साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी आणि वनडेपासूनदेखील बाहेर राहावे लागले. तो जर पूर्णपणे फिट झाला नाही तर तो आयपीएल मधून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    


हार्दिक पंड्या (Hardik Pandya)


वर्ल्डकप २०२३ दरम्यान हार्दिक गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. आता अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकला देखील तो खेळणार नाही अशी चर्चा सुरु आहे. हार्दिक पूर्णपणे खेळण्यास सक्षम झाला नाही तर त्याला आयपीएल २०२४ मालिका मुकावी लागू शकते. 


आणखी वाचा 


Nashik Tourism : नववर्षात नाशिकला जाताय? Top 10 ठिकाणांची A टू Z माहिती मिळवा एका क्लिकवर