IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये सलग दुसरे शतक झळकावणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल उघडपणे बोलला आहे. इतर खेळाडूंप्रमाणे वहाबलाही नकारात्मक टिप्पणीचा फटका बसतो यावर त्याने भर दिला. राहुल म्हणाला की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीमुळे स्वत:बद्दल विचार करण्यास वेळ मिळाला आणि समजलं की बॅटमधून उत्तर देणे हा सोशल मीडियावरील नकारात्मकता दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे.


तो म्हणाला की, आज मी शतक केल्यानंतर लोक गुणगान करत आहेत, पण 3-4 महिन्यांपूर्वी प्रत्येकजण मला शिवीगाळ करत होता. हा खेळाचा भाग आहे, परंतु मी असे म्हणू शकत नाही की त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. त्याचा परिणाम होतो. जितक्या लवकर तुम्ही त्यापासून दूर राहाल तेवढं तुमच्या खेळासाठी चांगले आहे.


राहुल होता संघातून बाहेर 


सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावल्यानंतर केएल राहुलने आपली प्रतिक्रिया दिली. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान केएल राहुल मध्यंतरी बाहेर पडला होता. त्यानंतर, केएल राहुलने आता कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे, आणि लगेचच शानदार शतक झळकावले.






केएल राहुललाही आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती आणि त्यानंतर अनेक महिने क्रिकेट खेळता आले नाही. या कारणास्तव तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संघाचा भागही नव्हता. तथापि, तो आशिया चषकातून परतला आणि त्याने शानदार फलंदाजी करून दाखवून दिले की त्याने यावर्षी दुखापतीतून सावरताना आपल्या गेमिंग कौशल्यावर खूप काम केले आहे.






आशिया कपमधून शानदार पुनरागमन


केएल राहुलने आशिया चषकात अनेक शानदार खेळी केल्या आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेतही त्याने केवळ नंबर-5 ची भूमिका चांगलीच निभावली नाही तर विकेटकीपिंगसह दमदार कामगिरी केली. केएल राहुलने कर्णधाराला डीआरएस घेण्याबाबत अगदी योग्य सल्ला दिला आहे. तथापि, सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात एकूण 245 धावा केल्या होत्या, परंतु दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 256 धावा केल्या होत्या. तसेच 5 विकेट्स गमावल्या होत्या. दरवेळेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर पुन्हा नडला असून नाबाद 140 धावांवर खेळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या