Ajinkya Rahane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार (दि. 23 सप्टेंबर) मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे येथील भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


वांद्रे रिक्लेमेशन येथील 2 हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे यांना तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने देण्यात येईल. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी 1988 मध्ये वितरीत करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सद्याची परिस्थिती वाईट असून, आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक रहाणे यांना देण्याची शिफारस केली.


याबद्दल अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. रहाणे सोशल मीडिया X वर म्हणाला, 'मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी, बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांनी सर्वांचे मुंबईतील जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी आणि क्रीडा सुविधेच्या माझ्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभार मानतो. ही युवा तरुण खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शनासह सक्षम करेल, ज्या शहरात माझा स्वतःचा क्रिकेट प्रवास सुरू झाला त्या शहरातील चॅम्पियन्सच्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन देईल. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी आणि नेतृत्वासाठी मी कृतज्ञ आहे.






क्रिकेट अकादमीचा हा भूखंड जवळपास 2 हजार स्वेअर मिटर आकाराचा आहे. सुनिल गावसकर यांना हा भूखंड 1988 मध्ये देण्यात आला होता. मात्र 2022 मध्ये त्यांनी इथे आपल्याला क्रिकेट अकादमी उभारता येणार नाही असं म्हटले, त्यानंतर म्हाडाने गावसकरांना केलेलं या भूखंडाचं वितरण रद्द केलं होतं. लिलावती रुग्णालयत आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ हा भूखंड आहे. येथील किंमत प्रती स्वेअरफूट 50 हजार रुपये ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे. त्यामुळे अगदी किमान किंमत म्हणजेच 50 हजार रुपये प्रति स्वेअर फूटने विचार केला, तरी या भूखंडाची किंमत 10 कोटींच्या घरात जाते.


हे ही वाचा -


CSK IPL 2025 Retention Players List : ऋतुराज, शिवम दुबे आणि...; चेन्नई सुपर किंग्ज 'या' खेळाडूंना ठेवणार कायम? MS धोनीवर अडकला पेच


WTC Points Table 2025 : WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा अपसेट; टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडला हरवून श्रीलंकेने ठोकला फायनलमध्ये दावा, समीकरण