Shoaib Akhtar look-alike Imran Muhammad bowling : शोएब अख्तर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्याने 2003 मध्ये ताशी 161.3 किमी वेगाने चेंडू टाकला होता, जो क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. अख्तरच्या रेकॉर्डला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण तो कोणीही मोडू शकले नाही. 


अख्तर याच्यानंतर त्यांच्यासारखा वेगवान गोलंदाज क्रिकेट जगतात आला नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोलंदाज हुबेहुब अख्तरप्रमाणे गोलंदाजी करत आहे.


विशेष म्हणजे शोएब अख्तरने स्वतः या गोलंदाजाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला होता. अख्तरप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूचे नाव इमरान मोहम्मद असून तो ओमानमध्ये क्रिकेट खेळतो.  


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इमरान शोएब अख्तरप्रमाणेच रनअप घेत असल्याचे दिसून येते. याशिवाय त्याची ॲक्शनही शोएब अख्तरसारखीच आहे. हे फक्त धावणे आणि गोलंदाजीची ॲक्शन सारखे असण्यापुरते मर्यादित नाही, तर इम्रानचे दिसणेही अख्तरसारखेच आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तर सारखी गोलंदाजी करणाऱ्या इम्रान मोहम्मदने वयाच्या 18 व्या वर्षी पाकिस्तान सोडला आणि आता तो ओमानची राजधानी मस्कत येथे राहतो, जिथे तो सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपला उदरनिर्वाह करतो. याशिवाय तो क्रिकेटचा सरावही करत राहतो आणि ओमानमध्ये होणाऱ्या लीगमध्ये भाग घेतो. आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.




हे ही वाचा -


CSK IPL 2025 Retention Players List : ऋतुराज, शिवम दुबे आणि...; चेन्नई सुपर किंग्ज 'या' खेळाडूंना ठेवणार कायम? MS धोनीवर अडकला पेच


WTC Points Table 2025 : WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा अपसेट; टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडला हरवून लंकेने ठोकला फायनलमध्ये दावा, समीकरण