World Test Championship 2025 Latest Points Table : क्रिकेट विश्वातील बहुतांश संघ सध्या ॲक्शनमध्ये आहेत. काही संघ वनडे क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत, तर काही कसोटी खेळत आहेत, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आयोजित केले जात आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा पराभव केला, तेव्हा भारतीय संघाचा पीसीटी वाढला होता, तर बांगलादेश संघाचे मोठे नुकसान झाले होते. 


दरम्यान, न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून तिथे दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा अपसेट पाहिला मिळाला, श्रीलंकेने न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलचे समीकरणही बदलताना दिसत आहे.


खरंतर, न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर श्रीलंका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या टॉप-3 संघांमध्ये आला आहे. भारत अव्वल आणि ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर असला तरी आता श्रीलंकेने आपला मजबूत दावा मांडला आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. भारताला या सायकलमध्ये अजून 9 सामने खेळायचे आहे, ज्यामध्ये किमान 6 सामने जिंकावे लागतील. जर भारताने 5 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. पण जर काही कमी ज्यादा झाले तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.  




श्रीलंका 8 सामन्यात 50 पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारत 71.67 पीसीटीसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.5 पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेनंतर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 42.86 पीसीटीसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या पीसीटीबद्दल बोलायचे तर ते 42.19 आहे. 


चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध दारूण पराभवाचा सामना करणारा बांगलादेशी संघ सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेशचा पीसीटी 39.29 आहे. याशिवाय इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही तिसरी सायकल आहे. ज्यामध्ये पण पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघ अंतिम फेरीत खेळतील. आतापर्यंत भारतीय संघाने दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. आधी न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचे स्वप्न भंगले होते.


हे ही वाचा -


Ind vs Ban Video: "रोहित भाईने 1 तास दिला होता, नाय तर..." लंच ब्रेकमध्ये ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? ऋषभ पंतचा खुलासा


Ind vs Ban: रोहित शर्माचा भर मैदानात जादूटोणा?; बेल्स फिरवून ठेवल्या, मंत्रही फुंकला; व्हिडीओ व्हायरल