मुंबई : विश्वविजेत्या भारतीय संघाचा (Team India) मुंबईत दिमाखदार आगमन आणि गौरव सोहळा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि इंडिया-इंडियाच्या जयघोषात आसमंत वाहून निघाला होता. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन डेक बसमधून विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या रस्त्यावर जनसमुदाय लोटला होता. वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाने चाहत्यांसोबत जंगी सेलीब्रेशन केलं.


टीम इंडियाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ


टीम इंडियाच्या विजयी परेडची सांगता वानखेडे स्टेडिअमवर झाली. भारतीय संघाच्या खेळाडूंचा स्टेडिअमवर जयघोष सुरु होता. ढोल-ताशाच्या गजरात वानखेडे स्टेडिअम न्हाऊन निघालं. टीम इंडियाने ढोल ताशाच्या तालावर डान्सही केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सिराज बुमराहसोबत सर्वच खेळाडूंनी फेर धरला. रोहित आणि विराटच्या गणपती डान्सने चाहत्यांचं लक्ष वेधलं.


वानखेडेवर चाहत्यांसोबत विश्वविजेत्यांचा 'विराट' जयघोष






गौरव सोहळ्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडिअमवरील चाहत्यांना अभिवादन करत ग्राऊंडवर राऊंड मारला. यारम्यान, माँ तुझे सलाम स्टेडिअमवर गाणं वाजवण्यात आलं. यावेळी किंग कोहलीच्या मागून सर्वांनी गाणं गायलं. कोहलीने हातवारे करत चाहत्यांना त्याच्या मागून गाणं गाण्यास सांगितलं. त्यानंतर माँ तुझे सलाम गाण्यावर सर्व खेळाडूंसह चाहत्यांनी गाण्यावर ठेका धरला. माँ तुझे सलाम गाण्याचा हा अंगावर शहारे आणणार व्हिडीओ पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरुन आल्याशिवाय राहणार नाही.


कोहलीसोबत चाहत्यांंनी गायलं 'माँ तुझे सलाम' गाणं






रोहित शर्माने चाहत्यांचे अभिवादन केले



मुंबईकर चाहत्यांचं रोहित शर्माने हातवारे करत अभिवादन केले. आम्हाला विश्वचषक जिंकण्याची जितकी इच्छा होती, त्यापेक्षा जास्त चाहते उत्साही होते. हा संघ खास आहे, या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळली, मी खूप लकी आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.


वानखेडेवर विराट-रोहितचा भन्नाट डान्स





रोहित शर्माकडून खेळाडूंचं कौतुक



रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते, सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला. सूर्यकुमार यादव यानं असे झेल घेण्यासाठी अनेकवर्षे सराव केलाय. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Virat Kohli : डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी, 'तो' क्षण कधीच विसरणार नाही, किंग कोहली वानखेडेवर भावूक