मुंबई : भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरुन 17 वर्षाचा दुष्काळ संपवला. टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024 ) मधील अंतिम सामन्यात भारताने सहा धावांनी सामना जिंकला आणि भारत विश्वविजेता ठरला. टीम इंडियाने अतिशय रोमांचक सामन्यात विजयाला गवसणी घातली. विश्वचषकातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासह सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ट्रॉफीसोबतचा फोटो सध्या सर्व भारतीयांसाठी खास आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर विश्वविजेत्या संघाचा बीसीसीआयकडून गौरव करण्यात आला.
डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी
वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारो चाहते दुपारपासून पोहोचले होते. वानखेडे स्टेडियममध्ये स्वागत समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरचं पाच षटकं महत्वाची ठरली. जसप्रीत बुमराह हा या पिढीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यानं आपल्याला सामन्यात पुन्हा-पुन्हा आणले. त्याची गोलंदाजी सर्वोत्तम झाली. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही टाळ्या वाजवून घेतल्या. आज जे पाहिले ते विसरता येणार नाही, असे विराट म्हणाला. विश्वचषकाइतकाच आजचा क्षण माझ्यासाठी खास होता.
'तो' क्षण कधीच विसरणार नाही
नेमकं काय म्हणाला विराट कोहली?
किंग कोहली वानखेडेवर भावूक
टीम इंडियाच्या विश्वचषकातील विजयानंतर मुंबईत विजयी यात्रा काढण्यात आली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत परेड झाली. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर विजयी परेडची सांगता झाली. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विराट कोहलीने यावेळी चाहत्यांने खूप आभार मानले.
पाहा व्हिडीओ : ढोल ताशाच्या तालावर टीम इंडियाचा गणपती डान्स
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले