Duleep Trophy 2024 India A vs India B : दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या सामन्यात भारत ब संघाने चमकदार कामगिरी करत भारत अ संघाचा 76 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू इसवरन होता तर भारत अ संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे होते. 


बर्थडे बॉय गिलचा संघ सामन्याच्या शेवटच्या दिवशी काही अप्रतिम कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. विजयासाठी 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गिलचा संघ केवळ 198 धावांवरच मर्यादित राहिला. केएल राहुलने सर्वाधिक 57 धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील गिलच्या संघाचा हा पहिलाच पराभव आहे. 






प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघाने 321 धावा केल्या. यादरम्यान मुशीर खानने 181 धावांची शानदार खेळी केली होती. त्याला नवदीप सैनीनेही 56 धावा करत चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल, भारत अ संघ पहिल्या डावात 231 धावांवर मर्यादित राहिला आणि भारत ब संघाने 90 धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात भारत ब संघाने दुसऱ्या डावात 184 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारत अ संघाला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य मिळाले परंतु संघ केवळ 198 धावा करू शकला.


लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाकडून दुसऱ्या डावात कर्णधार शुभमन गिलने 21 धावा केल्या. रियान परागने 18 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. तर केएल राहुलने 57 धावा केल्या. ध्रुव जुरेल आणि तनुष कोटियन यांना खातेही उघडता आले नाही. यानंतर आकाश दीपने खालच्या फळीत कसा तरी टिकून राहून बराच वेळ पराभव टाळला. त्याने 42 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. 


भारत ब संघाकडून यश दयालने ३ बळी घेतले. मुशीर खानला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता भारत क संघाकडेही 6 गुण आहेत. कर्णधार शुभमन गिलसाठी हा सामना कोणत्याही दृष्टीने चांगला नव्हता. 


हे ही वाचा -


Rishabh Pant Duleep Trophy : 'काय डाळ शिजते....' गिलच्या टीममध्ये पंतची घुसखोरी, Video होतोय तुफान व्हायरल