Mohammed Shami On Hardik Pandya : अष्टपैलू हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सची साथ सोडत मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने सलग दोनवेळा फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. एकवेळा गुजरातने जेतेपद पटकावलेय. यंदा हार्दिक पांड्या मुंबईच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहितला डावलत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. हार्दिक पांड्याने गुजरातची साथ सोडल्यानंतर मोहम्मद शामीने पहिल्यांदाच स्पष्टपणे वक्तव्य केलेय.कुणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, असे वक्तव्य मोहम्मद शामी याने केलेय. हार्दिक पांड्याने साथ सोडल्यानंतर गुजरातने कर्णधारपदाची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवली आहे.2024 आयपीएलमध्ये गुजरातची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर असेल. 


कुणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही


 हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत गुजारत टायन्सनचं कामगिरी कशी राहणार? या प्रश्नांचं उत्तर मोहम्मद शामी याने दिलेय. कुणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, असे शामी म्हणालाय. सोशल मीडियावर मोहम्मद शामीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक पत्रकार मोहम्मद शमीला विचारले की, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून बाहेर पडल्यानंतर किती फरक पडेल? या प्रश्नाच्या उत्तरात मोहम्मद शमी म्हणतो की, कोणीही साथ सोडली तरी काही फरक पडत नाही.






मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला केले गुजरात टायटन्सकडून ट्रेड 


नुकताच आयपीएलचा लिलाव पार पडला. पण या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. मागील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग बनला. मात्र, हार्दिक पांड्या आपल्या जुन्या संघात परतला. हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती. आयपीएल 2015 च्या मोसमात तो पहिल्यांदा खेळला. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. मुंबईने रोहितला डावलत हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलेय. 


पांड्याची आयपीएल कारकीर्द 


हार्दिक पांड्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 115 डावात फलंदाजी करताना त्याने 30.38 च्या सरासरीने आणि 145.86 च्या स्ट्राईक रेटने 2309 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 10 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत 33.26 च्या सरासरीने 53 बळी घेतले आहेत.


आणखी वाचा :


Australian Open 2024 : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम