IND vs AUS, ODI Series : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका आजपासून (17 मार्च) खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिकेत 1-0 ची आघाडी घेता येईल. तर ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका गमावल्या एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आज विजयाने सुरुवात करेल. तर आजच्या महत्त्वाच्या या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


सामना होणाऱ्या विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. या स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 241 आहे, जी दुसऱ्या डावात 211 पर्यंत खाली घसरते. खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी चांगली असली तरी स्लो गोलंदाजी करणाऱ्यांना देखील मदत करते. पण आज पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती  वेगळी असू शकते. वेगवान गोलंदाजांना देखील फायदा मिळू शकतो. तसंच या ठिकाणी खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी 9 संघाने पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे जो कोणी संघ नाणेफेक जिंकतो, त्याला कदाचित या रेकॉर्डवर टिकून राहावेसे वाटेल आणि प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे.


हवामान कसं असेल?


हवामान विभागाच्या माहितीनुसार विशाखापट्टणमसह आंध्र प्रदेशच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विशाखापट्टणममधील सामन्यादरम्यान तापमान 26 ते 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर येथे पावसाची 80 टक्के शक्यता आहे. तिथे रात्रीही पावसाची 50 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना खेळवताना व्यत्यय येऊ शकतो. तसेच, पावसामुळे सामना रद्द करावा लागण्याचीही शक्यता आहे.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा


हे देखील वाचा-