Shakib Al Hasan Cricket Bangladesh: बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने चमकदार कामगिरी केली आहे. बांगलादेशमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाकिबने वेगवान फलंदाजी करत रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. 93 धावा करून तो बाद झाला आणि शतक हुकले, पण त्याआधीच त्याने इतिहास रचला.


Shakib Al Hasan Cricket Bangladesh: 7000 धाव करणारा बांगलादेशचा दुसरा खेळाडू


एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळी घेणारा शाकिब अल हसन जगातील तिसरा क्रिकेटर बनला आहे. सनथ जयसूर्या आणि शाहिद आफ्रिदी यांच्या यादीत सामील होणारा तो क्रिकेटर बनला. आयर्लंडविरुद्ध सिल्हेट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 24 धावा करून त्याने हा विक्रम केला. तमीम इक्बालनंतर तो बांगलादेशसाठी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. तमिमच्या नावावर 8146 धावा आहेत.


Shakib Al Hasan Cricket Bangladesh: 20 षटकांत गाठला हा टप्पा 


बांगलादेशच्या डावाच्या 20व्या षटकात कर्टिस कॅम्फरचा एक रन घेत शकीबने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. शाकिबने या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध चार बळी घेत 300 विकेट्स पूर्ण केले होते. चट्टोग्राम येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रेहान अहमदच्या विकेटसह त्याने हा टप्पा गाठला. यानंतर ही कामगिरी करणारा तो जयसूर्या आणि डॅनियल व्हिटोरीनंतरचा तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.


Shakib Al Hasan Cricket Bangladesh: बांगलादेशचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज


शाकिब हा बांगलादेशचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने कसोटीत 231 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 131 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या 443 विकेट्ससह T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने T20 मध्ये 6000 धावा, 400 विकेट आणि 50 झेल पूर्ण केले आहेत. याआधी गेल्या दोन वनडेत शाकिबने अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. हा त्याचा सलग तिसरा 50 प्लस स्कोअर होता. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 53 वे अर्धशतक झळकावले. अलीकडेच शाकिबच्या संघाने विश्वविजेत्या इंग्लंडचा टी-20 मालिकेत 3-0 ने पराभव केला. शाकिब हा टी-20 चा कर्णधार आहे, तर तमिम इक्बाल वनडेचा कर्णधार आहे.


183 धावांनी सामना जिंकला


या सामन्यात बांगलादेशने 183 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. बांगलादेशचा गोलंदाज इबादत हुसेनने गोलंदाजी करताना 6.4 षटकांत 4 बळी घेतले, तर नसूम अहमदने 3 आणि तस्किन अहमदने 2 बळी घेत आयर्लंडचा पराभव केला.