IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघ पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडीवर आहे. आता दोन्ही संघांमधील दुसरा सामना उद्या अर्थात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Arun Jaitly Cricket Stadium) होणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी खेळपट्टी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.


याआधी नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू वर्चस्व गाजवत होते. अशा स्थितीत दिल्लीत होणाऱ्या या सामन्याची खेळपट्टी कशी असेल, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी फलंदाजासाठी की गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त असेल ते पाहूया...


कशी असेल दिल्लीची खेळपट्टी?


दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच चांगली राहिली आहे. क्रिकेटचे स्वरूप कोणतेही असो, या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या नेहमीच पाहायला मिळते. अरुण जेटली स्टेडियमची छोटी आणि वेगवान बाउंड्रीही फलंदाजांसाठी खूप फायदेशीर असते. फिरकीपटूंनाही येथे चांगली मदत मिळते. अशा स्थितीत दोन्ही संघांचे फिरकीपटू पहिल्या सामन्याप्रमाणे येथेही वर्चस्व गाजवू शकतात.


भारत आणि ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), अॅश्टन अगर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी.


गेल्या 63 वर्षांपासून भारत दिल्लीत अजिंक्य


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 6 दशकांत ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाचा पराभव करता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाला एकदाही दिल्लीत टीम इंडियाचा कसोटी सामन्यांत पराभव करता आलेला नाही. 1959 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा शेवटचा पराभव केला होता. याचाच अर्थ गेल्या 63 वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाला दिल्लीत एकाही कसोटी सामन्यात टीम इंडियाला हरवता आलेलं नाही. 


हे देखील वाचा-