India Vs Australia Champions Trophy 2025 : भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy Final 2025) अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने हे लक्ष्य 11 चेंडू बाकी असताना 4 विकेट्सने गाठले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा विराट कोहलीचा होता, परंतु तो शतक झळकावण्यास हुकला. या सामन्यात कोहलीने 84 धावा केल्या आणि त्याला त्याचे 52 वे एकदिवसीय शतक पूर्ण करण्याची संधी होती पण तो हुकला. अॅडम झंपाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
कोहली बाद झाल्यानंतर राहुल रागावला...
84 धावांच्या खेळीवर खराब शॉट खेळल्यानंतर विराट कोहली झेलबाद झाल्यानंतर केएल राहुल त्याच्यावर रागावलेला दिसत होता. कोहली बाद झाल्यानंतर तो म्हणाला, मी मारत होतो ना यार. राहुलने असे म्हणण्याचा अर्थ असा होता की, मी मोठे फटके मारत होतो. तु मारण्याची गरज नव्हती, आरामात खेळून तुमचे शतक पूर्ण करू शकला असता. या सामन्यात, कोहलीला त्याच्या जबरदस्त खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
केएल राहुलने ठोकला विजयी षटकार....
भारताने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला आणि 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी भारताने हे विजेतेपद दोनदा जिंकले होते, तर 2017 मध्ये भारत अंतिम फेरीत पराभूत झाला होता. या सामन्यात केएल राहुलने भारतासाठी विजयी षटकार मारला.
या सामन्यात कांगारू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 49.3 षटकांत 264 धावा केल्या. भारताला विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य दिले. भारताने 48.1 षटकांत 6 गडी गमावून 267 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना 4 गडी राखून जिंकला. या सामन्यात केएल राहुलने 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 42 धावा करत नाबाद राहिला.
हे ही वाचा -