India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG)  कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. राजकोटच्या मैदानावर पाच वर्षानंतर कसोटी सामना होत आहे. 


राजकोटमध्ये पाच वर्षानंतर कसोटी सामना - 


राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पाच वर्षांनतर कसोटी सामना होत आहे. या मैदानावर 2018 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आमनासामना झाला होता. राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने झाले आहेत. यातील एका सामन्यात भारताने विजय मिळवलाय तर एक सामना अनिर्णित राहिलाय. भारताने या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव केला होता, तर इंग्लंडविरोधात झालेला सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडकडून भारताला शानदार टक्कर मिळाली होती. 


2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना - 


राजकोटच्या मैदानात पहिल्यांदा 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगला होता. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 537 धावा चोपल्या होत्या. जो रुट आणि बेन स्टोक्स यांनी शतकी खेळी केली. जो रुट याने 124 धावांची खेळी केली होती, तर बेन स्टोक्सनं 128 धावा जोडल्या होत्या. त्याशिवाय मोईन अली यानेही 117 धावा जोडल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताने पहिल्या डावात 488 धावा केल्या होत्या. भारताकडून मुरली विजय याने 126 तर चेतेश्वर पुजारा याने 124 धावांची खेळी केली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 260 धावांवर डाव घोषित केला. पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावा केल्या होत्या. त्यामुळे सामना अनिर्णित सुटला होता. 


इंग्लंड - वेस्ट इंडिज कसोटीत काय झालं ?


भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2018 मध्ये कसोटी सामना झाला होता. हा सामना भारताने 272 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाने 9 विकेटच्या मोबदल्यात 649 धावांचा डोंगर उभरला होता. या सामन्यात सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याने शतकी खेळी केली होती. पृथ्वी शॉ याने 134 धावांची खेळी केली. त्याशिवाय विराट कोहलीने 139 तर रविंद्र जाडेजाने 100 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिज पहिल्या डावात 181 आणि दुसऱ्या डावात 196 धावांवर ऑल आऊट झाली होती. 



इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.



टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 


1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला


आणखी वाचा :


IND vs ENG 3rd Test : इंग्लंडला राजकोट कसोटीपूर्वी मोठा धक्का; सर्वोत्तम कामगिरी करणारा हुकमी खेळाडू थेट घरी परतला